संस्थेचे विविध उपक्रम व कार्य
1) दरवर्षी रक्तदान शिबिरांचे प्रायोजकत्व स्वीकारुन रक्तदान शिबिरास आर्थिक मदत करीत असतो.
२) दरवर्षी अहिल्यानगर जिल्हा वारकरी संघास भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला आर्थिक मदत करीत असतो.
३) दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टँकर पुरवीत आहोत व त्यासाठी आर्थिक मदत करत असतो.
४) ज्या शाळेचे कामकाज अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे, त्या शाळेला शासकीय अनुदान नसल्यामुळे त्यांना सहकारी संघ पुणे यांची मंजूरी घेऊन शाळेला बर्याच वेळा भरीव देणगी देत असतो.
५) संस्थेने सभासद कल्याण निधि उभारला आहे. या निधीतुन आर्थिक मदत संस्था देते.
६) सामाजिक निधी – संस्थेने सामाजिक निधीची उभारणी केली आहे. या निधीतुन जे संस्थेचे सभासद नाही अशा सामाजिक संस्था, गरजू व्यक्तींना या निधीतुन आर्थिक मदत करत असतो.
७) दरवर्षी सभासदांच्या पाल्यांचा, शिक्षण कला व क्रीडा क्षेत्रांत विशेष कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी साधारण ४० ते ५० पाल्यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन वार्षिक सभेत सत्कार होत असतो.
८) संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाले त्यावर्षी सर्व सभासदांना १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून दिले.
९) संस्थेची शहराच्या मध्यवर्ती भागात स्वमालकीची अशी सुसज्ज इमारतीमध्ये मुख्य शाखा आहे.
१०) सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
११) संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवाच्या वेळेस सर्व सभासदांना रु. १,०००/- ची ठेव पावती भेट म्हणून देण्यात आली तसेच रौप्य महोत्सवानिमित्त सर्व सभासद, खातेदारांसाठी प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन केले होते व वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केलेले होते.
१२) संस्थेमध्ये सुरक्षितेसाठी २४ तास सुरक्षारक्षकाची / सिक्युरिटीची व्यवस्था केलेली आहे.
१३) याशिवाय सायरन सिस्टीम, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
१४) सेवकांना दरवर्षी युनिफॉर्म दिला जातो.
१५) जेष्ठ नागरिक सभासदाला वयाची ६५ वर्षे पुर्ण केल्यानंतर रु. १,०००/- ठेव पावती सभासद कल्याण निधीतुन भेट म्हणून दिली जाते.
१६) संस्थेला ३१ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या प्रत्येक सभासदांना रु. २,५००/- चा भेट चेक दिलेला आहे.
१७) सन २०२० साली कोविड ग्रस्तांसाठी रु. ५१,०००/- आर्थिक मदत केली आहे.
१८) सन २०२०-२०२१ च्या कोविड काळात, कोविड झालेल्या सभासदाला रु. १५,०००/- ची आर्थिक मदत औषधोपचारसाठी दिलेली आहे.
पायाभूत सुविधा
⭐ सीबीएस तंत्रज्ञान
संस्था जसजशी वाढत जाते तसतसे त्वरित व अचूक ग्राहक सेवेची आवश्यकता देखील वाढते. त्याच वेळी, बर्याच सामरिक (strategic) व आर्थिक निर्णयांसाठी व्यवस्थापकीय माहितीचे संग्रहण आणि विश्लेषण आवश्यक असते. ज्या साठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. बँकिंग व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून आहे आणि त्यामध्ये बदल होत आहेत, संस्थेने सीबीएस सिस्टिम स्वीकारले आहे.
⭐ मोबाईल बँकिंग
संस्थेच्या मोबाईल बँकिंग अप्लीकेशनचा वापर करून संस्थेतील सेव्हिंग खात्यातुन आयएमपीएस, आरटीजीएस, NEFT / संस्थेच्या एका शाखेतुन दुसर्या शाखेत / स्वत:च्या वैयक्तिक खात्यात या सारख्या फंड ट्रान्सफर ची सुरुवात केली आहे. खातेदार सर्व लिंक केलेल्या खात्यात शिल्लक देखील तपासू शकतात. खाते उतारा डाउनलोड करू शकता. वापरण्यासाठी साधे, सोपी व अनुकूल पद्धत आहे.
⭐ लॉकर सुविधा
संस्थेच्या खातेदारांना मोल्यवान वस्तूंची सुरक्षा देण्यासाठी लॉकर सुविधा सुरू केलेली आहे. या सुविधेमध्ये लहान, मध्यम, मोठे आकाराचे लॉकर उपलब्ध करून दिले आहे. इतर संस्थांच्या लॉकर भाडे पेक्षा कमीत कमी दरामध्ये लॉकर सेवा उपलब्ध करून दिले आहे.
⭐ एस. एम. एस. सुविधा
आम्ही आमच्या सर्व खातेदारांना विनामूल्य एसएमएस अलर्ट सेवा पुरवीत आहे. खातेदाराने संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केल्यास, त्या व्यवहारासंदर्भात त्वरित एसएमएस मार्फत माहिती मिळते. त्यामुळे सस्थेच्या व्यवहारासंदर्भात पारदर्शकता समजते.