अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्याचा आर्थिक उत्थान साधण्याच्या उदात्त हेतूने सहकारी संस्था चालविण्याचा विडा उचलला. आणि आज सहकारात यशस्वीतेने नानाविध क्षितिजे पार करणारी, श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लि. समस्त समाजमनाच्या आस्थेचा विषय ठरत आहे.
किसनलाल बंग
चेअरमन
‘सहकार चळवळ’ म्हटलं की अहिल्यानगर हे नांव चटकन डोळ्यासमोर येतं. अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. म्हणुनच काळाची गरज ओळखुन ४० वर्षापूर्वी परमपूज्य श्री. डोंगरेजी महाराज यांच्या शुभाशीर्वादाने सामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि तळागाळातील गरजूंना सावकाराच्या पाशातून मुक्त करण्यासाठी ही संस्था आपण स्थापन केली. स्थापनेपासूनच नावाजलेली आपली संस्था आज ४० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सहकार चळवळीला ग्रहण लागल्यामुळे सहकार क्षेत्रात हल्ली फार उलथापालथ होत आहे. असे असतांनाही आपली संस्था सभासदांच्या व असंख्य ठेवीदारांच्या बळावर सुदृढ झाली आहे. आपल्या सारख्या सुज्ञ सभासदांनी व ठेवीदारांनी संस्थेवर दृढ विश्वास व्यक्त करून संस्थेकडे आपल्या बहुमोल ठेवी सोपविल्या आहेत. त्यामुळे संस्थेकडे आज ८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी जमा झाल्या आहेत. संस्थेने देखील सभासदांच्या आणि ठेवीदारांच्या विश्वासास सार्थ ठरवून सर्वसामान्य जनतेपासून, लहान-मोठ्या व्यापार्यांना व उद्योजकांना अर्थसहाय्य करून मदतीचा हात दिला आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशाप्रकारे संस्थेने इतर बँकामध्ये निधींची गुंतवणूक करून स्वबळावर संस्थेचा आर्थिक व्यवहार अत्यंत चोख, पारदर्शक आणि यशस्वीपणे चालू ठेवला आहे. आपल्या संस्थेचा राखीव निधी व इतर निधी रुपये ३४.८० कोटी इतका आहे. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती अगदी भक्कम आहे हे मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. ४० वर्षात संस्थेने अनेक योजना राबविल्या आहेत. संस्थेने सर्वसामान्य जनतेला मदत करण्याच्या उद्देशाने सोनेतारण कर्ज योजना सुरू केली आहे. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच या योजनेद्वारे संस्थेने ५७.६० कोटी रुपया पर्यंत अर्थ सहाय्य केले आहे. आपल्या संस्थेचा कर्जावरील व्याजदर सर्वात कमी आहे. सोनेतारण कर्जासाठी तो ७% (७% रिबेट वजा जाता) आणि सर्व साधारण कर्जावर १०% (४% रिबेट वजा जाता) आहे.
सध्या विज्ञान-तंत्रज्ञान युग आहे. त्यामुळे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. याचा विचार करून संस्थेने माळीवाडा येथील मुख्य शाखा व सावेडी येथील शाखा आधुनिक संगणक संच बसवून अद्यावत केले आहेत. त्यायोगे संस्थेचे सर्व व्यवहार अचूक व जलदगतीने होत आहेत. आज आपली संस्था अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणुन नावारूपाला आली आहे. संस्थेच्या नफ्यातुन दरवर्षी सभासद कल्याण निधी काढला जातो त्याची स्वतंत्र नियमावली केली आहे. त्यानुसार जे सभासद अथवा त्यांचे नातेवाईक गंभीर आजाराने पीडित आहेत, हृदयविकारासारख्या व आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या विकारामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी संस्थेकडे जे सभासद मागणी करतील त्यांना या निधीतून रु. १५,०००/- पर्यंत अर्थसहाय्य केले जाते. याशिवाय संस्थेने स्वतंत्र धर्मदाय निधी उभारला असुन दरवर्षी नफ्यातुन धर्मदाय निधी काढला जातो. या निधीचा वापर सहकार कायदा नियम व संस्थेचे पोटनियम यातील तरतुदींनुसार सर्व अटी व शर्तीचे पालन करून सामाजिक संस्थांना समाज प्रबोधनपर कार्यक्रम करण्यासाठी देणगी स्वरुपात मदत केली जाते. काही कार्यक्रमांचे प्रायोजकत्व स्वीकारुन संस्थेतर्फे कार्यक्रमास मदत दिली जाते व अशा कार्यक्रमात संस्थेच्या विविध योजनांची जाहिरात केली जाते. त्यामुळे संस्थेची प्रतिमा वाढते व संस्थेच्या मुदत ठेवी व कर्जावरील व्याजदराबाबत जनतेला माहिती होते. त्याचप्रमाणे संस्थेने श्री रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशन या शैक्षणिक संस्थेला भरीव देणगी दिलेली आहे.
संस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीकोणातुन नवीन संकल्प करू या.
धन्यवाद !
|| जय श्रीकृष्ण ||
संस्थेची आर्थिक स्थिति
दि. ३१/०३/२०२५ अखेर
दि. १९/०८/१९८५ रोजी श्रावण महिन्यात परमपूज्य श्री डोंगरेजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण श्री. रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लि., अहिल्यानगर ही संस्था सामान्य जनतेच्या सेवेचे व्रत घेऊन ४० वर्षापूर्वी सुरू केली तेव्हा पासुन आजपर्यंत संस्थेने सभासदांच्या सहकार्याच्या बळावर यशस्वी वाटचाल केली आहे व प्रत्येक वर्षी संस्था प्रगतीचे पाऊल पुढे पुढे टाकीतच आहे.
श्री. राजेंद्र मालु
व्हाईस चेअरमन
संस्थेचे स्थापनेपासूनचे एक लक्ष्य म्हणजे आम्ही आमच्या सेवेत कमी पडणार नाही हे सुनिश्चित करणे. सतत चांगल्या सेवेसाठी प्रयत्न करणे. प्रगतीचा आलेख कितीही मोठा झाला तरीही मूळ उद्देशांपासून विचलित न होणे. सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मानांकन मिळविणे.
संस्थेने सीबीएस बँकिंग प्रणालीचा अवलंब केला आहे आणि एसएमएस सेवा कार्यान्वित केली आहे. मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस या सारख्या सेवा सुरू करण्याच्या उंबरठ्यावर असुन लवकरच कार्यान्वित करीत आहे. भविष्यात उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्याच्या आशेने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
संचालक
संचालक
संचालक
संचालक
(दि. १९-४-२०२५ पर्यंत)
संचालक
संचालक
श्री. मधुसुदन सारडा
संचालक
अॅड. अशोक बंग
संचालक
श्री. राजेंद्रकुमार कंत्रोड
संचालक
श्री. अनुराग धूत
संचालक
(दि. २०-४-२०२५ पासून)
श्रीमती मथुराबाई झंवर
संचालिका
(दि. १९-४-२०२५ पर्यंत)
सौ. राजकमल मणियार
संचालिका
(दि. २०-४-२०२५ पासून)
श्री. राजेंद्रकुमार कंत्रोड
संचालिका
(दि. २०-४-२०२५ पासून)
श्री. अनुराग धूत
संचालिका
श्री. देवराव साठे
संचालक
श्री. साईनाथ कावट
संचालक
(दि. २०-४-२०२५ पासून)
श्री. शशिकांत पुंडलिक
व्यवस्थापक
श्री. कुमार आपटे
अधिकारी (OSD)